Customer Awareness
ऑंनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची दक्षता तसेच काय करावे व काय करू नये ?
1) अज्ञात /अनोळखी कोणतेही अॅप्स कधीही डाउनलोड करू नका.
2) तुमची वैयक्तिक ओळखपत्रे /ATM PIN/UPI PIN कधीही ऑनलाइन शेअर करू नका.
3) संशयास्पद लिंक कधीही उघडू किंवा शेअर करू नका.
4) कोणतीही अज्ञात पेमेंट विनंती स्वीकारू नका.
5) Whats APP वरती किवा email वरती आलेल्या नोकरीच्या /खरेदीच्या/प्राप्तीच्या /ऑफरच्या लिंक ची सत्यता पडताळल्याशिवाय त्यांना कधीही प्रतिसाद देऊ नका.
6) GOOGLE वरून customer care क्रमांकावर संपर्क साधताना सावधगिरी बाळगा.
7) आर्थिक व्यवहाराहाराबाबत काही शंका असल्यास संबधित बँकशी संपर्क साधा.
8) QR कोडद्वारे पेमेंट करताना तपशिलाची पडताळणी करा.
9) जर तुम्ही न केलेल्या आर्थिक व्यवहाराहाराबाबत तुम्हाला पैसे कपात केल्याचा SMS आल्यास , तर ताबडतोब आपल्या बँकेस /ई वॉलेटला कळवा आणि UPI सह.DEBIT card चे व्यवहार Block करा.
10) मोबाईल मध्ये कोणतेही अनोळखी अँप डाऊनलोड अथवा Install करू नका,तसेच सणासुद्धीच्या काळात प्राप्त होणाऱ्या कॅशबॅक, आकर्षक रिटर्न्स, वारंवार प्राप्त होणाऱ्या त्वरित कर्ज, नोकरीच्या ऑफर्स किंवा पैशांची मागणी येणाऱ्या अनोळखी SMS किंवा लिंकवर क्लिक करू नका
11) बँक कधीही कार्ड/पिन/ओटीपी/सीव्हीव्ही तपशील मागत नाही. हे कोणाशीही शेअर करू नका. मोबाईल/ईमेलवर आलेल्या अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका